वायरलेस डिवाईसने होऊ शकतो कॅन्सर

मोबाईल ही सध्या तरूणांच्या काळाची गरजचं बनली आहे, असे म्हटले तरी खोटे वाटनार नाही.  हाच मोबाईल कॅन्सरसारख्या घातक रोगाचे कारणही होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

Updated: Jul 27, 2015, 03:15 PM IST
वायरलेस डिवाईसने होऊ शकतो कॅन्सर title=

लंडन : मोबाईल ही सध्या तरूणांच्या काळाची गरजचं बनली आहे, असे म्हटले तरी खोटे वाटनार नाही.  हाच मोबाईल कॅन्सरसारख्या घातक रोगाचे कारणही होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

वायरलेस डिवाईसमधून उत्पन्न होणाऱ्या रेडिऐशनमुळे होणारे मेटाबॉलिक असंतुलन तुमच्या आरोग्याला त्रस्त करू शकतो. यामुळे बरेच न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोग तसेच कॅन्सरसारखा आजार होण्याचा धोका संभवू शकतो. 

या असंतुलनाला ऑक्सिडेटिव्ह तणावही म्हणू शकता. हा शोध नॅशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक बायोलॉजी आणि मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. 

रेडिओ फ्रिक्वेंसी रेडिएशन (आरएफआर)मुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे फक्त कॅन्सरचं नाही तर डोकेदुखी, थकवा तसेच त्वचेची जळजळ यासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागते, असे वक्तव्य 'नॅशनल युनिवर्सिटी ऑफ फु़ड'चे शोधकर्ता आईगर यांनी केले आहे.

या प्रकारच्या रेडिएशनमुळे मानवी शरिरावर जास्त वाईट परिणाम होवू शकतो. आरएफआर हे कॅन्सरचे एक कारण असू शकते अशी माहिती १०११ मध्ये कॅन्सरचा शोध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.