मुंबई : प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की त्याची गर्लफ्रेंड किंवा पत्नी त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवत नाही. अनेकांना असं वाटत असतं की त्यांची गर्लफ्रेंड सगळ्या गोष्टी शेअर करते. पण काही वेळा असा विचार करणं चुकीचं ठरतं. कारण अनेक महिला त्यांच्या पार्टनरपासून काही गोष्टी लपवतात.
१. एक्स बॉयफ्रेंड : अनेकदा मुली त्यांच्या पूर्वीच्या बॉयफ्रेंड विषयी काहीही सांगणं पसंद करत नाही. एक्स बॉयफ्रेंडच्या अनेक गोष्टी त्या लपवून ठेवतात. मागच्या भूतकाळाचा आताच्या संबंधावर काही परिणाम होऊ नये अशी त्यांची भावना असते.
२. मेकअप सिक्रेट : महिला मेकअपच्या गोष्टी जोडीदाराला सांगत नाहीत. मेकअप सिक्रेटबद्दल दुसऱ्याला काही माहित पडू नये असं त्यांना वाटंत असतं. महिलांना नेहमीच सुंदर दिसावं असं वाटतं.
३. मुलींमधलं गॉसिप : अनेक महिला एकत्र आल्या की खूप गप्पा मारत असता. त्याच्यातलं गॉसिप खूप मसालेदार असतं. त्यांच्यातलं हे बोलणं ते कधीही कोणाला कळू देत नाहीत.
४. शारीरिक संबंध : महिलांना त्यांची इमेज खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांची इमेज टिकवण्यासाठी आणि संबंधावर काही परिणाम होऊ यासाठी ते ही गोष्ट त्यांच्या जोडीदारापासून लपवतात.