नवी दिल्ली : चीनचा अॅपल फोन म्हटल्या जाणाऱ्या शाओमी फोनच्या पेटंटचा वाद निर्माण झाला आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
पेटंटबाबतचा वाद निर्माण झाल्याने न्यायालयाने शाओमीची आयात आणि विक्री थांबविण्याचे निर्देश भारतातील स्थानिक विक्रेते, ई-कॉमर्स विक्रेती कंपनी फ्लिपकार्ट तसेच केंद्रीय सीमाशुल्क विभागाला दिले आहेत.
इरिक्सन या कंपनीने शाओमीने प्रथमदर्शनी इरिक्सनच्या आठ प्रकारच्या महत्वाच्या नोंदणीकृत पेटंटचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने इरिक्सनने न्यायालयात धाव घेतली होती. शाओमीने हे पेटंट वापरण्याची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक होते.
मात्र याबाबत कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जुलैमध्ये थेट भारतीय बाजारमध्ये प्रवेश केला आहे, असा आरोप झिओमी कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.