याहूची 100 कोटी अकाऊंट हॅक

तुम्ही याहू युसर्स असाल आणि तुमचे याहूचं अकाऊंट असेल तर तात्काळ तुम्हाला त्याचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याहूची एक बिलियन अर्थात 100 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.

Updated: Dec 16, 2016, 10:19 AM IST
याहूची 100 कोटी अकाऊंट हॅक title=

नवी दिल्ली : तुम्ही याहू युसर्स असाल आणि तुमचे याहूचं अकाऊंट असेल तर तात्काळ तुम्हाला त्याचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याहूची एक बिलियन अर्थात 100 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.

सप्टेंबर महिन्यात ही अकाऊंट हॅक झाल्याचं याहूकडून सांगण्यात आलंय. युजर्सच्या अकाऊंटमध्ये महत्त्वाचा डेटा चोरीला गेल्याचा दावा करण्यात आलाय. ज्यात त्यांचं नाव, इमेल आयडी, जन्मदिवस, टेलिफोन नंबर, पासवर्ड, इन्क्रिप्टेड आणि अन-इन्क्रिप्टेड सिक्युरिटी प्रश्न-उत्तर यांचा समावेश आहे.. 

याच पार्श्वभूमीवर याहूनं सर्व यूजर्संना पासवर्ड तसेच सिक्युरीटी प्रश्न-उत्तर बदलण्याचं आवाहन केलंय. मोठ्या हॅकला बळी पडलेल्या यूजर्सला याची माहिती देण्यात आली असून सुरक्षेसाठी पावलं उचलल्याचं याहूनं म्हटलंय. 

यूजर्सच्या अन-इन्क्रिप्टेड प्रश्नांची व्हॅलिडिटी संपवून टाकल्याची माहिती याहूने दिलीय. यामुळे हॅकर्स अकाऊंट एक्सेस करु शकणार नसल्याचा दावाही याहूकडून करण्यात आलाय.