बाजारात आली यामाहाची सॅल्युटो बाइक, किंमत ५२,००० रुपये

अँटी लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये आपला जम बसविण्यासाठी यामाहानं पुन्हा एकदा कंबर कसलीय. यामाहानं १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवी बाइक सॅल्युटो बाजारात आणलीय. कंपनीनं या बाइकची किंमत जवळपास ५२,००० रुपये ठेवलीय.

Updated: Apr 18, 2015, 04:37 PM IST
बाजारात आली यामाहाची सॅल्युटो बाइक, किंमत ५२,००० रुपये title=

नवी दिल्ली: अँटी लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये आपला जम बसविण्यासाठी यामाहानं पुन्हा एकदा कंबर कसलीय. यामाहानं १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवी बाइक सॅल्युटो बाजारात आणलीय. कंपनीनं या बाइकची किंमत जवळपास ५२,००० रुपये ठेवलीय.

कंपनीनं दावा केलाय की, ही बाइक कुटुंबियांना वापरण्यासाठी एक बजेट बाइक आहे. कंपनीनं सॅल्युटोमध्ये १२५ सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, ४ स्पीड ट्रांसमिशनचं इंजन लावलंय, जे  ८.२ बीएचपी, ७००० आरपीएम आणि १०.१Nm, ४५०० आरपीएमचा पॉवर देते. ही बाइक ७८ किलोमीटर प्रति लीटरचा दमदार मायलेज देईल.

बाइकची लांबी २०३५ मीटर, उंची १०८० एमएम आणि जाडी ७०० एमएम आहे. या बाइकचं ग्राउंड क्लिअरंस पण १८० एमएम आहे. सोबतच बाइकमध्ये ड्रम ब्रेक लावला गेलाय. एकूण ही बाइक एक चांगली बजेट बाइक ठरू शकते. बाजारात या बाइकची स्पर्धा बजाजच्या डिस्कव्हर आणि होंडाच्या शाइन सोबत असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.