नवी दिल्ली : स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एका स्मार्टफोनचा विचार तुम्ही नक्कीच करू शकाल.
'योटाफोन' हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. कंपनीनं सुरुवातीला या फोनची किंमत २४,९९९ रुपये निर्धारीत केली होती. परंतु, हाच फोन आता मात्र केवळ ६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनचं वैशिष्ट्यं म्हणजे याचा डिस्प्ले... तुम्हाला प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एक डिस्प्ले दिसत असेल... पण, या फोनमध्ये मात्र दोन डिस्प्ले उपलब्ध आहेत. एक समोरच्या बाजुला आणि दुसरा मागच्या...
योटाफोनच्या या फोनची किंमत कमी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... सुरुवातीची किंमत २४,९९९ रुपयांवरून कमी करून १७,९९९ रुपये, दुसऱ्यांदा १२,९९९ रुपये, तिसऱ्यांदा ८,९९९ रुपये आणि आता चौथ्यांदा ६,९९९ रुपये करण्यात आलीय. योटाफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
योटाफोनची वैशिष्ट्यं...
४.३ इंच एलसीडी (पुढे) आणि ४.३ इंच ईपीओ डिस्प्ले (मागे)
१.७ जीएचझेड ड्युएलकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
२ जीबी रॅम
३२ जीबी इंटरनल मेमरी
१३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा
१ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
अॅन्ड्रॉईड ४.२.२ जेलीबीन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.