मुंबई : स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.
अनेकदा आपण मोबाईल संपूर्ण चार्ज झाल्यानंतरही तो प्लगवरुन काढत नाही. यामुळे बॅटरी खराब होते.
कधीही बॅटरी 100 टक्के चार्ज करु नये. लिथियम आर्यन बॅटरी पूर्ण चार्ज न करताही चांगल्या पद्धतीने काम करु शकते.
काहींना संपूर्ण बॅटरी संपल्यावर चार्ज कऱण्याची सवय असते. मात्र असे करु नका. 10 टक्के चार्ज उरलेली असतानाच स्मार्टफोनला चार्ज करा. बॅटरी संपेपर्यंत वाट पाहू नका.
जीपीएसवर चालणारे अॅप बंद करा. हे अॅप अधिकाधिक बॅटरीचा वापर करतात.
मोबाईल चार्ज करताना कधीही गरम ठिकाणी ठेवू नका. तसेच इतर कोणत्याही डिव्हाईसवर ठेवून चार्ज करु नका.