मुंबई : मोबाईल सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. मात्र इंटरनेटच्या वापरामुळे मोबाइलची बॅटरी लवकर 'डाऊन' होते. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यावर उपाय शोधून काढलाय गेलाय की, तुम्ही फक्त चाला.
मात्र तुमच्या या प्रश्नाला उत्तर शोधलंय रॉयल कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी. तुम्ही जितके अंतर चालाल, तितकी अधिक वीजनिर्मिती करणारे एक तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांनी विकसित केलंय.
चप्पलमध्ये बसवलेल्या प्लेट्सच्या मदतीने पिझो इलेक्ट्रिसिटी पद्धतीने वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प भविष्यात केवळ मोबाइलच नव्हे तर अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उपकरणांसाठी 'ऊर्जादायी' ठरणारा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.