आनंद परांजपेंचा जय महाराष्ट्र

मंदार मुकुंद पुरकरशिवसेनेने आनंद परांजपे अंगी कोणतेही राजकीय कसब नसताना केवळ प्रकाश परांजपेंचे वारसदार म्हणून उमेदवारी दिली. आधी ठाणे आणि नंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांना विजय मिळवता आला तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य एकनिष्ठ शिवसैनिकांनी जीवाचं रान केल्यामुळेच.

Updated: Jan 23, 2012, 12:44 AM IST

मंदार मुकुंद पुरकर

 

१९८७

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात निकाराची लढत होती. काँग्रसेचे वसंत डावखरे शिवसेनेच्या उमेदवाराला अवघ्या एक मतांनी पराभूत करत महापौरपदी विराजमान झाले. शिवसेनेचे एक मत फुटल्याचं उघड झालं.

 

तत्कालीन ठाणे जिल्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा आनंद दिघे यांनी गद्दारांना अद्दल घडवू अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आणि त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची भरदिवसा भरवस्तीत अत्यंत निर्घूणपणे हत्या करण्यात आली. खोपकर यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आनंद दिघेंना अटक झाली. पण सर्वात महत्वाचं आहे ते जाणून घेणं की महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एक मताने पराभूत झालेला शिवसेनेचा उमेदवार कोण होता...ते होते प्रकाश विश्वनाथ परांजपे.

 

२०१२

आनंद प्रकाश परांजपे दोन वेळा लागोपाठ खासदार म्हणून निवडून गेलेल्या प्रकाश परांजपेंच्या सुपूत्राने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर थेट एण्ट्री घेतली. आज जरी आनंद परांजपे मी अजुनही सेनेतच असल्याचं सांगत असले तरी ते केवळ आणि केवळ आपली खासदारकी वाचवण्यासाठी. आनंद परांजपे यांनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं तर त्यांना कळेल आपण काय करुन बसलो आहेत.

 

कालाय तसमै नम:

 

प्रकाश परांजपे दोन वेळा ठाणे नगरपालिका, दोन वेळा ठाणे महापालिका आणि चार वेळा सलगपणे खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरेंनी आसमान दाखवत आपल्या एक मताने झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. ठाणे महापालिका चालवणारा ब्रेन अशी ओळख असलेल्या प्रकाश परांजपेंनी लोकसभेच्या कामकाजात सहभाग घेऊन आपली छाप पाडली. परांजपेंचे इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व हा दिल्लीच्या वर्तुळातही कौतुकाचा विषय होता.

 

शिवसेनेने आनंद परांजपेंच्या अंगी कोणतेही राजकीय कसब नसताना केवळ प्रकाश परांजपेंचे वारसदार म्हणून उमेदवारी दिली. आधी ठाणे आणि नंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांना विजय मिळवता आला तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य एकनिष्ठ शिवसैनिकांनी जीवाचं रान केल्यामुळेच. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपेंनी वसंत डावखरेंचे कडवं आव्हान मोडून काढलं होतं. परांजपे हे केवळ डोंबिवलीतील ब्राह्मण समाजाच्या जोरावर विजयी झाले हे विधान अर्धसत्य ठरेल. कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील आगरी समाजानेही आनंद परांजपे यांना भरभरून मतदान केलं ते केवळ सेनेशी असलेल्या बांधिलकीच्या भावनेतूनच हे विसरता येणार नाही.

 

ठाण्याच्या शिवसेनेची धुरा तेंव्हा आनंद दिघे, मो.दा.जोशी, प्रकाश परांजपे आणि सतीश प्रधान यांच्या हाती होती. मो.दा.जोशी यांनी अक्षरश: रक्ताचे पाणी करुन जिल्ह्यात सेनेची पक्षबांधणी केली आणि तेंव्हा युवा असलेल्या आनंद दिघेंना त्यांनीच सेनेत आणलं. शिवसेनेच्या इतिहासात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपदाची निर्मिती मो.दा.जोशींसाठीच केली होती.

 

सतीश प्रधान यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात आणि त्यानंतर महापौरपदाच्याही कारकिर्दीत ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं योगदान दिलं. प्रधान यांच्या कल्पकता आणि धडाडीने राबवलेल्या विकास कामांमुळेच ठाणे शहराचा चेहरामोहरा सुरवातीच्या काळात बदलला.

 

आनंद दिघे नावाच्या झंझावाताने युवा पिढीवर अक्षरश: गारुड केलं. दिघेंनीच ठाणे जिल्ह्याचे रुपांतर शिवसेनेसाठी चिरेबंदी बालेकिल्ल्यात केलं. आनंद दिघेंमुळे ठाण्यासारख्या अवाढव्य पसरलेल्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेची संघटना पोहचली, रुजली आणि तिचं रुपांतर एका बलाढ्य राजकीय शक्तीत झालं. त्यामुळेच नंतरच्या काळात पंचायत समिती असो की जिल्हा परिषद, किंवा आमदार आणि खासदार अशा सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेने घवघवीत यश संपादन केलं.

 

दरम्यानच्या काळात सतीश प्र