( एक मोलकरिण आणि तिच्या मालकिणीमधील संवाद)
बाई- काय ग... चार दिवस कामाल का आली नाहीस...
मोलकरीण- बाईसाहेब मी गावाला गेली होती चार दिवस...
बाई- अगं मग सांगुन नाही का जायचं ?
मोलकरीण- पण बाईसाहेब मी फेसबुकवर स्टेस अपडेट केलं होतं...
बाई- काय ?
मोलकरीण- साहेबांनी कॉमेंट सुद्दा केली होती... मीस यू म्हणून...
असे फेसबुकवरचे जोक्स तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मोबाईमध्ये रोज येत असतील... मात्र असा उथळ(पकाव) जोक आता सांगण्याचं कारण काय... कारण तर आहेच...माझ्या फेसबुकवर नुकतीच घडलेली घटना शेअर करावीशी वाटली... कारण फेसबुकवर सगळ्याच गोष्टी शेअर करतात ना... आता तुम्हाला वाटेल या पिढीतला असुन हा असं फेसबुकच्या मुळावर उठल्यासारखं काय खरडतोय ( टाईपतोय)...पण आधी माझ्या फेसबुकवर घडलेला खऱा किस्सा( यात पालिची मगर करण्याचा अजिबात प्रयत्न नाही) वाचा म्हणजे फेसबुक की फेस टू फेस हा प्रश्न तुम्हालाही पडेल....माझ्या मोबाईलमध्ये निंबुज् नावाचं सॉफ्टेवेअर असल्यामुळे मी 24 तास फेसबुक आणि गुगलवर ऑनलाईन असतो... नेहमीप्रामाणे काम संपवुन घरी जात होतो... ट्रेनमध्ये सर्वसाधारण गर्दी होती... तितक्यात माझा मोबाईल वाईब्रेट झाला... फेसबुक चॅट वर मेसेज आला होता... एका मित्राचा मेसेज होता... मग सुरू झालं फेसबुक चॅट...
मित्र- hi Pankaj
मी- hi
मी - h r u
मित्र-fine
मी-how was u r diwali
मित्र- not good
मी- y
मित्र- mare badi mumy ki death ho gayi... aaj 10th day hain
मी- i m very sorry... muzay pataa nahi thaaa..
मित्र- yaar lakin mainay FACE BOOK PAR STATUS UPDATE KIYA THAA...
...तर काकी वारल्याचं स्टेटस पठ्यानं फेसबुकवर अपडेट केलं होतं... मी ही मग ट्रेनमध्ये गर्दी आहे वगैरे बहाणे सांगून त्या चॅटमधुन सुटका करून घेतली... ok by म्हणुन मित्र ऑफलाईन झाला... मग मात्र त्या चॅटनं माझं डोकं चाटायला सुरवात केली...आणि मग फेसबुकच्या जमान्यात वावरणाऱ्या मला प्रश्न पडला... फेस बुक की फेस टू फेस... एरवी सुख-दु:खात एकमेकांना भेटणारे आपण एकदम इतके संकुचित कसे झालो की मृत्यू सारख्या गंभीर घटनां सुद्धा फेस बुकवर शेअर करू लागलो...फेसबुकसारख्या सोशल साईट्समुळे अनेक गोष्टी जवळ आल्या... शाळा सोडल्यानंतर फेसबुकवर शाळेतली बॅकबेंचर्सची टाळकी पुन्हा एकत्र आली...
कदाचीत फेसबुकवर त्याला त्याची ती भेटली... अनेक विषय लोकांसमोर मांडण्यासाठी हक्काची जागा मिळाली... मनात साठुन राहिलेल्या गोष्टींसाठी फेसबुक ग्राफिटी वॉल बनलं... मान्य हे सगळं मान्य... मात्र आपल्या काकीच्या निधनाचं स्टेटस फेसबुकवर अपडेट करणं याला तुम्ही काय म्हणाल...मी चाळीत राहीलेलो असल्यामुळे आजुबाजुला अशी काही वाईट घटना घडली की हातातलं काम सोडून त्या घरी जाणं...अगदी येणाऱ्या लोकांना दिसावं म्हणुन अंगणात बल्प लावण्यापासून ते सावलीसाठी ताडपत्री बांधण्यापर्यंतचे सोपस्कार आम्ही पार पाडलेत... त्यामुळे स्वत:ला सोशल एनिमल म्हणवणारे आपण या वाक्यातील सोशल हा शब्द फक्त नेटवर्कींग पुरताच मर्यादीत ठेवला... त्यामुळे एरवी फेस टू फेस भेटून आपली सुख-दु:ख शेअर करणारी माणसं दुरावतील की काय अशी भिती निर्माण झाली आहे...