‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय

प्रसाद घाणेकर ‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.

Updated: Jul 13, 2012, 03:21 PM IST

प्रसाद घाणेकर

www.24taas.com,  मुंबई

 

‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय. मीडियाने तर बातम्या देण्याचं काम चोख बजावलंय.वर्तमानपत्रात आदर्शबाबत रोज एक बातमी उगवतेय. तर चॅनेलवाले चर्चा, महाचर्चा आणि विशेष चर्चा घडवत आहेत. उशिरा का होईन सत्य नेहमीप्रमाणे ‘शेवटी’च बाहेर येणार. पण आज पिंपळाच्यापारावर ‘सप्तजणां’ची बैठक बसली होती आणि तिचा आजचा विषयही होता आदर्श सोसायटीघोटाळा. चर्चेसाठी राजकीय पटलावर नेहमी वावरणारे बाबा राजगिरे, गल्लीबोलात समाजसेवा करणारे दादासमाजे, सर्व गोष्टींबाबत विश्लेषणाची बाजू मांडणारे जागृत विचारे, टीव्ही अँकर नेहा नटवे, कशाचीही भीडभाड न राकता-चूक की बरोबरयाची तमा न बालगता बोलणारे सत्या परखडे, स्वत:चे वर्तमानपत्र चालविणारे आणिसंपादक म्हणून काम करणारे राजा संपादके आणि नेहमीच शेवटी बोलणारे आणि सामान्यांचेप्रतिनिधी करणारे सदा सामान्ये.

 

पिंपळाच्या पारावर बैठकीला सुरुवात झाली. जवळच्या चहावाल्याकडूनअद्रक मार के चहा मागवला. चहाचा घोट घेत राजा संपादके बोलले, ‘वा ssss काय फक्कड चहा झालाय. एकदम झकास. फर्स्ट क्लास. अद्रकचा मस्त वासयेतोय.’ काय बाबा राजगिरे, काय धापा मारताय. अहो. अद्रकचा नाही आदर्शचा वास येतोय.’ सत्या परखडे परखडपणे बोलले. परखडेंचा स्वभाव तसा परखड आणिथोडासा तापट. सत्य काय, असत्य काय,  चूक काय, बरोबर काय, याचा सारासार विचार करणं त्यांच्यास्वभावात नाही. जे काय बोलायचं ते तेथल्या तेथेच. ताडफाड हिशेब आणि तत्काळ रिझल्ट.‘आsssय’, बाबा राजगिरे तोंडावर हात ठेवतम्हणाले. परखडेंच्या ओरखड्याने बाबांच्या तोंडाला चटका बसला.

 

‘जाऊ द्या हो राजगिरे, तुम्ही लक्ष देऊ नका परखडेंकडे,’ 'अनाकलनीय' वर्तमानपत्राचे संपादक राजा संपादकेमधेच बोलले. अहो संपादके, जाऊ दे काय, जेव्हापासून आदर्श सोसायटीचा घोटाळागाजतोय ना त्या दिवसापासून हा परखडे माझ्याकडे परखड, पारखी आणि संशयी नजरेने पाहतोय. माझंनाव बाबा आहे, मी आदर्शचा बाबा नाही. हवं तर आबांना विचारा.’ बाबा राजगिरे जरा जोशातच बोलले. राजगिरेंचा रोख आपल्याकडे आहे हे पाहून परखडे हातावर हात आपटत म्हणाले,‘अहो राजगिरे, तुमची सवयच तशी आहे. स्वत:चं ठेवायचंझाकून, दुस-याचंही ठेवायचं दाबून आणि नको त्याचं दाखवायचं उघडून.’

 

अय्या sss, वा काय बाईट आहे परखडे तुमचा. जबरदस्तटोला लगावलात हो बाबांना.’ मानेला जरासा झटका देत हातातील कंगवा बूमसारखा पुढे करत टीव्हीअँकर नेहा नटवे जरा हटकेच बोलली.  तिच्या या अचानक बोलण्याने सर्व जण तिच्याकडे पाहतच राहिले.अँकरिंग करताना जेवढा होश दाखवला नव्हता तेवढा जोश आता नेहा नटवेला चढला होता.

 

या नटवेला काय बोलावे, याचा राजा संपादके विचार करत असताना आतापर्यंत गप्प बसलेले दादासमाजे सावकास व संमजसपणे म्हणाले,‘बेटा नटेव, बाबा पक्के राजकारणी आहेत. त्यांचा स्वभाव हा स्थायी नसला तरीअस्थायी म्हणजेच सरड्याच्या रंगासारखा बदलणारा आहे. आणि वयाचा विचार करता परखडेजरी त्यांना बोलले तरी तू अती उत्साह दाखवू नकोस. नाय, काय असतं नव्या दमाच्या पोरींमध्येउत्साह जास्त असतो.’ दादांच्या बोलण्याने थोडी वरमलेली नटवे परखडेंच्या तोंडाजवळ असलेलाकंगवारूपी बूम तसाच ठेवत म्हणाली,‘सॉरी...सॉरी समाजेजी,.. म्हणजे मला काय म्हणायचंय माझा आवाजतुमच्यापर्यंत पोहोचला हेच मोठं. धन्यवाद.’

 

‘परखडे आणि नटवे तुम्ही जरा धीर धरा. असं उतावळी होऊ नका. शेवटी सर्व प्रश्न हे विचारविनिमय करूनच सुटतात आणि सोडवायचेअसतात. आता राजकारण्यांनी ठरविलेल्या त्यांच्याच हातात असणाऱ-या यंत्रणा तपास करतआहेत ना...मग आपण एक नागरिक म्हणजे सुशिक्षित नागरिक म्हणून सत्य जगासमोरयेईपर्यंत शांतपणे वाट पाहिली पाहिजे, प्रतीक्षा केली पाहिजे.’ ग्लासमधील चहा संपवत आतापर्यंतशांतपणे ऐकणार आणि फेमस विचारवंत जागृत विचारे यांनी आपली बाजू मांडली.‘विचारे, तुमचं विचारमंथन होईपर्यंत दुसराघोटाळा बाहेर पडेल. स