खाण तशी माती अन् भ्रष्टाचार तशी नीती !

कोळसा खाणीवाटपातील भ्रष्टाचार उघड झालाय. सरकारने खोदलेला घोटाळा ‘कॅग’ने उघडा केलाय. भ्रष्टाचाराची खाण बनत चाललेल्या देशात हिमालयाच्या पर्वतरांगांना लाजवतील अशा भ्रष्टाचाराच्या पर्वतरांगा तयार झाल्या आहेत. एक एक करता त्या पर्वतरांगांची आता टोके दिसू लागलीत. एका घोटाळ्यापेक्षा दुसरा घोटाळा कसा मोठा असेल याचीच दक्षता अधिक घेतली जातेय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 25, 2012, 11:52 PM IST

प्रसाद घाणेकर, www.24taas.com
कोळसा खाणीवाटपातील भ्रष्टाचार उघड झालाय. सरकारने खोदलेला घोटाळा ‘कॅग’ने उघडा केलाय. भ्रष्टाचाराची खाण बनत चाललेल्या देशात हिमालयाच्या पर्वतरांगांना लाजवतील अशा भ्रष्टाचाराच्या पर्वतरांगा तयार झाल्या आहेत. एक एक करता त्या पर्वतरांगांची आता टोके दिसू लागलीत. एका घोटाळ्यापेक्षा दुसरा घोटाळा कसा मोठा असेल याचीच दक्षता अधिक घेतली जातेय. आता अहवालाच्या सत्यतेची चौकशी केली जाईल. परंतु चौकशीतून सत्य काय उघड होणार आणि सत्य उघडच झालं तर ते आजच्या व्यवस्थेच्या चौकटीवर किती टिकेल आणि किती टिकवले जाईल, हे काळालाही कळणार नाही.
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षा मोठी व्याप्ती असलेल्या खाणवाटप घोटाळ्यामुळे देश कालवंडलाय, एवढंच नव्हे तर आता त्यांच्यावर ‘डार्क काजळी’ पकडलीय याची कुणालाही काळजी नाहीय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजीनामा मागण्याचं ‘काळजीवाहू राजीनामानाट्य’ घडेल, पण एक मात्र नक्की की, या सुजलाम, सुफलाम देशात भ्रष्टाचार ‘मलय’म झालाय आणि याच विषयावर पिंपळपारावर चर्चा करण्यासाठी नेहमीची मंडळी जमली. चहा पिता पिता सत्या परखडेंनी राजकारणी बाबा राजगिरेंची खोड काढली. “काय राजगिरे...काय म्हणताय... नाही म्हटलं तोंड कुठं काळं करून आलात कोळशासारखं ?”“कुठे काय...कुठे काय ?” दोन्ही पंजांनी चेहरा पुसता पुसता राजगिरे गळबळले.“आले असतील कोळशाच्या खाणीत तोंड घालून”, दादा समाजे मधेच बोलले.
समाजेंच्या बोलण्यामुळे राजगिरेंनी त्यांच्याकडे डोळे वटारले आणि बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात नेहा नटवेने ओठ उघडले, “राजगिरे, राजगिरे...तुमचा कोळशाच्या खाणीत तोंड लपण्याचा अनुभव कसा होता ?” नटवेच्या प्रश्नाने आगीतून धुराचे लोळ उसळावेत तसे राजगिरेंच्या डोळ्यांतून राग उसळला.“अगं नटवे, असं सटवीसारखं बोलू नकोस. कसे झाले तरी ते आपल्या देशाची धुरा खाणीतून निघणा-या धुरासारखी खांद्यावरून वाहत आहेत”, राजा संपादके नटवेला समजावण्याच्या सूरात बोलले.“अहो संपादके, त्यात काय चुकले नटवेचं ? आज खाणीवाटपाच्या भ्रष्टाचाराचा धूर पसरतोय तो राजगिरे खाणीत गिरल्यामुळेच ना !” परखडेंनी वरखडा काढला. पण नटवेच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेले राजगिरे गप्प बसतील तर कोळशाची खाण शपथ! “हे बघा, तुम्ही जे जे काय बोलताय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, ही काळ्या कोळशावरची रेघ आहे. माझ्या नावाचा उगाच भोंगा वाजवू नका.” राजगिरे तिडकीने बोलले. “बरोबर आहे तुमचं, राजगिरे. शेवटी ती काय, ती काळ्या कोळशावरचीच रेघ आहे. भिंग वापरूनही दिसणार नाही.” दादा समाजेंनी कोळशाचा तुकडा तोडावा तसं राजगिरेंना तोडलं.“राजगिरे, तुम्ही जे काय करता ते अयोग्य आणि पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही सांगता एक, करता एक आणि वागता एक. त्यामुळे तुमच्यात बाकी कशात एकता नसली तरी भ्रष्टाचारात एकवाक्यता आहे. जनतेशी असे वागणं आणि त्यांची फसवणूक करणं म्हणजे जनतेचा विश्वासघात करण्यासारखं आहे. जनता सहनशील असली तरी जास्त सहन करणार नाही.” संपादकेंनी आपलं मत मधेच मांडलं.
“संपादके, हे तुमच्या ‘अनाकलनीय’मध्ये छापलंय ना...मग पुन्हा तेच कशाला ऐकवता ?” नटवेने मधेच सवयीप्रमाणे नाक खुपसलं.“असू दे... असू दे...तू कशी एकच बातमी दोन वेळा वाचतेस आणि दाखवतेस तसा हा प्रकार आहे.” सत्या परखडे मधे पडले. तेवढ्यात आतापर्यंत गप्प बसलेले विचारे वैचारिक मांडू लागले, “राजगिरे, तुम्ही सर्व प्रक्रिया छुपा-छुपीसारखं कशासाठी करता ? आज देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ‘युवा’ नेत्यांना कळतंय आणि तुम्हा म्हाता-यांना कळत नाही म्हणजे काय. देश भ्रष्टाचाराने पोखरला जात आहे आणि तुम्ही अधिक पोखरत आहात. देशाला वाचवायचं सोडून सर्व जण भ्रष्टाचार करण्यात मग्न आहेत.”“विचारे, तुमचं वैचारिक थांबवा बघू. मी काय म्हणतो, खाणवाटपाचे जे नियम तयार केले ते सर्वांना अमान्य झाले. त्यामुळे जास्त वेळ न घेता खाणवाटप करून टाकले. नियमही नको आणि निकषही नको. चांगल्या कामाला मुहूर्त कशाला ? नाही का !”“हेच...हेच ते. मी अगोदरपासून कोकळत होतो की, खाणवाटपात गिरलेल्या राजगिरेंचा हात आहे. सीबीआयतर्फे त्याचा तपास व्हावा. पण लक्षात घेतो कोण ? मी बडबड करतो असंच सर्वांना वाटायचं. पुराव्याशिवाय आरोप करायची सवय नाही या दादा समाजेंना, समजलात.” दादा समाजेंनी एखाद्या कसलेल्या मल्लासारखे दंड थोपटले.“अहो समाजे, या राजगिरेंना पोटात घेऊन समजवा नाहीतर पोटतिडकीने समजवा...त्यांच्या कालवंडलेल्या चेह-यावरची भ्रष्टाचाराची काजळी जाणार नाही. गेंड्यांच्या चामडीवर कधी परिणाम होणार नाही.” परखडेंनी राजगिरेंच्या धगधगत्या कोळशावर थंड प