www.24taas.com, नागपूर
नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांना तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत. तीन कार्यकर्ते एकाच कुटुंबातले असून तिघेही महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
मामा आणि मिना धोटे हे प्रभाग क्रमांक ४५ मधून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर त्यांचा मुलगा पंकज प्रभाग क्रमांक ८ मधून मनसेच्या तिकीटावर मैदानात उतरला आहे. मामा धोटेही गेल्यावेळी मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. यावेळी मात्र ते अपक्ष म्हणून लढत आहेत. मामा पत्नी आणि मुलाला प्रचाराच्या टिप्स देतात.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक ५६ मधून मुन्ना यादव आणि मंगल यादव हे काका-पुतणे भाजप आणि काँग्रेसकडून लढत आहेत. पल्लवी रामकूळे आणि राकेश पन्नासे हे काका आणि पुतणीही एकमेकांसमोर लढत आहेत. राजकीय विरोधक झाल्यामुळं ते आता रक्ताची नातीही विसरले आहेत. राजकारणासाठी रक्ताची नाती विसरणारी ही मंडळी निवडून आल्यावर मतदारांना तर विसरणार नाहीत ना असा प्रश्न पडतो आहे.