पिंपरीत उमेदवार झाले फरार

पिंपरीत उपमहापौर डब्बू आसवानी विरूद्ध काँग्रेसच्या अमर मुलचंदानी यांची लढत लक्षवेधी ठरली आहे. मात्र दोन्ही उमेदवार फरार असल्यानं कार्यकर्तेच प्रचाराची धुरा सांभाळत आहे.

Updated: Feb 8, 2012, 12:10 AM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरीत उपमहापौर डब्बू आसवानी विरूद्ध काँग्रेसच्या अमर मुलचंदानी यांची लढत लक्षवेधी ठरली आहे. मात्र दोन्ही उमेदवार फरार असल्यानं कार्यकर्तेच प्रचाराची धुरा सांभाळत आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातला वॉर्ड ५४ चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर डब्बू आसवानी आणि काँग्रेसचे अमर मुलचंदानी यांच्यातल्या संघर्षानं प्रचाराची सुरुवात झाली. परस्पर विरोधी तक्रारीही करण्यात आल्या. त्यानंतर दोघे पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले पोलिसांना त्यांना अटक केली नाही.

आता दोघेही फरार असल्याचं पोलिसांच म्हणण आहे. त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांच म्हणण आहे. त्यामुळं उमेदवारांच्या गैरहजेरीत कार्यकर्त्यांना प्रचाराची धुरा सांभाळावी लागते आहे. पिंपरीतली लढत तर लक्षणीय आहे मात्र उमेदवारच फरार आहेत. पोलिसही बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळं आता कार्यकर्त्यांच्या जोरावरच ही निव़डणूक होणार काय असा प्रश्न आहे.