गोपीनाथ मुंडेंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा राष्ट्रवादीचा कट रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे

Updated: Feb 7, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, बीड

 

माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा  कट  राष्ट्रवादीने रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. बीडमध्ये काका पुतण्या यांच्या मधला वाद शिगेला पोहचला आहे. हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी आणि पोलिसांनी षडयंत्र रचल्याचं गोपीनाथ मुंडे यांचे म्हणणे आहे.

 

धनंजय मुंडे यांनी झी २४ तासशी बोलताना हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. पंकजा मुंडे यांच्या गाडीवर हल्ला झालाच नसल्याचं आणि हे केवळ मतदारांची शेवटच्या क्षणी सहानुभूती मिळवण्यासाठीच गोपीनाथ मुंडे यांनी केलेला बनाव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले. निवडणुक जिंकण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे डावपेच चांगल्या प्रकारे माहित असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

 

गेल्या काही दिवसात बीडच्या राजकारणात संघर्ष निकाराला पोहचला आहे. परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत करुन गोपीनाथ मुंडेंना आव्हन दिलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे वडिल पंडितअण्णा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.