www.24taas.com, यवतमाळ
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांचे पथक घेऊन मतदारांशी संपर्क साधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या आदल्या रात्री हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येतं आहे. नायब तहसिलदार कुमरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्यांची कारवाई कुठवर केली जाणार हे देखील एक गुढच आहे. कारण की आजवर अनेक राजकिय नेत्यांवर आचारसंहिता भंगाची कारवाई म्हणून गुन्हे दाखल होतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता माणिकराव ठाकरे आणि नितीन राऊत यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.