क्रिश 2 मध्ये ‘नर्गीसी अदा’?

क्रिश 2 मध्ये खलनायिकेसाठी चित्रांगदा सिंह आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या नावाची चर्चा सुरू होती, पण आता ‘रॉकस्टार’द्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या नर्गीस फाख्रीनने हा रोल पटकावण्यात बाजी मारल्याची बी टाऊनमध्ये चर्चा आहे.

Updated: Oct 25, 2011, 03:08 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

क्रिश 2 मध्ये खलनायिकेसाठी चित्रांगदा सिंह आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या नावाची चर्चा सुरू होती, पण आता ‘रॉकस्टार’द्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या नर्गीस फाख्रीनने हा रोल पटकावण्यात बाजी मारल्याची बी टाऊनमध्ये चर्चा आहे.

 

हे सर्वश्रुतच आहे की, या छोट्याशा भूमिकेसाठी चित्रांगदा तयार नव्हती, तर जॅकलीनने उत्तरार्धात हृतिक बरोबरच्या किसिंग सीनमुळे या रोलला नापसंती दर्शवली होती. जेव्हा सिनीयर रोशन यांनी ‘रॉकस्टार’ मधील या फ्रेश चेहऱ्याला पाहिले, त्यावेळी त्यांनी नर्गीस ला क्रिश 2 ची ऑफर दिली. हृतिक सोबत हॉट सीन असल्याने बहुदा नर्गीस ने मागे-पुढे न पाहता या रोलला होकार दिल्याचेही बोलले जात आहे. 

 

[caption id="attachment_3584" align="alignleft" width="300" caption="नर्गीस फाख्रीन"][/caption]

नर्गीसला या सिक्वल सिनेमाची स्क्रिप्ट फारच आवडल्याचे सांगण्यात येते,  या खलनायिकेच्या भूमिकेचा लूक आणि इतर गोष्टींवर सध्या काम सुरू आहे.  शेवटी राकेश रोशन यांना त्यांचा मनाजोगती अभिनेत्री मिळाल्याने रोशन कंपनीही खूष दिसते आहे.  ही भूमिका जबरदस्त बोल्ड असून नर्गीस ने बिकनी सीन देण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हंटले आहे.  

 

नर्गीसचा कमनीय बांधा आणि सेक्सी लूक या भूमिकेसाठी साजेल असेच आहे.  मर्डर 2  मध्ये जॅकलीनने दाखविलेल्या सेक्सी अदांनी तिला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.  परंतु,  तिने यास नकार दिला. मजेशीर गोष्ट अशी की,  ऐनवेळी चित्रांगदा आणि जॅकलीन यांनी या प्रोजेक्ट मधून माघार घेतल्यास नर्गीस फाख्रीनला अशा वेळेस घेण्याचा प्लान फिल्ममेकरने तयार ठेवला होता.

 

सिनेमाचं चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे,  त्यामुळे अजूनही नर्गीस या भूमिकेसाठी या सिनेमात असणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.  कारण की,  राकेश रोशन यांनी बिपाशा बासूला या भूमिकेसाठी ऑफर केल्याचे खास सूत्रांकडून कळते.