शाहरुखची दिवाळी की दिवाळं?

दिवाळीत शाहरुख खानचा ‘रा. वन’ रिलीज होतोय. संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष या सिनेमाच्या भवितव्याकडे लागलं आहे. ‘रा वन’च्या निर्मितीसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

Updated: Oct 24, 2011, 10:57 AM IST

मंदार मुकुंद पुरकर, झी २४ डॉट कॉम, मुंबई 

दिवाळीत शाहरुख खानचा ‘रा. वन’ रिलीज होतोय. संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष या सिनेमाच्या भवितव्याकडे लागलं आहे. ‘रा वन’च्या निर्मितीसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. फिल्म इंडस्ट्रीजच्या इतिहासात सर्वाधिक निर्मिती खर्चामुळे बॉलिवूडच्या हदयाचे ठोके वेगाने पडायला सुरवात

झाली असल्यास नवल वाटायला नको. शाहरुख खानने सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. दिवाळी या सर्वात मोठ्या सणात लोक सढळ हाताने पैसे उधळतात आणि हिंदी सिनेमांचे भारतीयांना असलेले वेड सर्वश्रृत आहेच. त्यामुळे  किंग खानचा सिनेमा, दिवाळी सारख्या सर्वात मोठ्या सणाचा उत्साह याचे समीकरण बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल याचीच प्रतिक्षा बॉलिवूडला आहे. रा वनचे बजेट प्रचंड असल्याने नफा किती होईल याबद्दल प्रश्नचिन्हच आहे. पण रा वन पेक्षाही महत्वाचा

मुद्दा आहे तो फिल्म इंडस्ट्रीजच्या अर्थकारणाशी संबंधित आहे.

 

सिनेमाचे भवितव्या संदर्भात सर्वात महत्वाचे असते ते फक्त टायमिंग आणि टायमिंगच. आणि

दस्तुरखुद्द किंग खानही त्याबाबत कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही आहे. त्यामुळेच त्याने दिवाळी सणाची अचूक वेळ ‘रा वन’च्या रिलीजसाठी मुक्रर केली आहे. बॉलिवूडच्या दृष्टीने गेली दोन वर्षे अत्यंत वाईट गेली आहेत. पण यंदाच्या वर्षात अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केल्याने सध्या तरी मूड आशादायी आहे. आजवरच्या सर्वाधिक सुपर डुपर १५ हिट सिनेमांपैकी अर्ध्याहून अधिक सिनेमे हे सणांच्या किंवा सुट्टीच्या विकएंडला रिलीज झालेले आहेत.

 

[caption id="attachment_3098" align="alignleft" width="300" caption="रा 'वन'"][/caption]

यंदा सलमानचा बॉडीगार्ड इदच्या दिवशी तर धर्मेंद्र, सनी आणि बॉबीचा यमला पगला दिवाना

लोहरी सणाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला. बॉडीगार्डने तर बॉक्स ऑफिसवर पैशांचा अक्षरशह: पाऊस पाडला. गोलमाल भाग ३ हा सुपर डुपर हिटसुध्दा दिवाळीत प्रदर्शित करण्यात आला. तर रेडी, सिंघम आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा हे हिट सिनेमे सण किंवा सुट्ट्यांच्या कालावधीत रिलीज करण्यात आले नव्हते.

 

सणांच्या दिवशी रिलीजना दहा टक्के जास्त प्रेक्षक वर्ग लाभतो असं या क्षेत्रातल्या जाणकारांचे म्हणणं आहे. एकाच दिवशी दोन बिग बजेट सिनेमा प्रदर्शित न करण्याचा अलिखीत नियम आहे, याला अपवाद आहे तो सणासुदीच्या दिवसांचा. सणांच्या दिवशी कोणतेही नियम लागु होत नाहीत त्यामुळेच त्या काळात सर्व जण समान पातळीला अस

तात. हल्ली सिने निर्मिती प्रचंड खर्चिक झाल्याने सणांच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करणं सुरक्षित समजलं जातं. आजकाल सिनेमाचे सरासरी बजेट २० कोटी रुपयांचे असते, तीन वर्षाच्या तुलनेत ते दुप्पट झालं आहे. बॉलिवूडमधील कलाकारांच्या मानधनात आणि मार्केटिंगच्या खर्चात झालेली प्रचंड वाढ ही त्यामागची कारणे आहेत. तर दुसरीकडे डिजीटल तंत्रज्ञानामुळे वितरण खर्चात घसरण झाली आहे. भारतात दरवर्षी तब्बल ११०० सिनेमे रिलीज होतात आणि वर्षात फक्त ५२ आठवडे असतात. त्यापैकी काही दिवस रिलीजसाठी विचारात घेतले जात नाही त्यात श्राध्दपक्षाचा कालावधी, परिक्षांचा मोसम, क्रिकेटच्या सामन्यांचे दिवस. आणि आता भर पडली आहे ती आयपीएल सामन्यांची त्यात आठ आठवड्यांचा कालावधी जातो. त्यामुळेच सण आणि सुट्टयांच्या कालावधीत सिनेमा रिलीज करणं सुरक्षित समजलं जातं. आमिर खानचा गझिनी आणि ३ इडियटस ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये रिलीज करण्यात आला होता. यंदाचा तमिळ मेगा हिट मनकथा हा इद आणि पूजाच्या कालावधीत रिलीज करण्यात आला. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत पोंगल सणाच्या काळात रिलीजला प्राधान्य देते.

 

सिने क्षेत्रातील तज्ञ कोमल नहाटांच्या मते वर्षभरात एकुण रिलीज होणाऱ्या सिनेमांपैकी फक्त १८-२० टक्के सिनेमा फायदा कमावतात. पण हिट सिनेमांच्या नफ्याच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचं बदल दिसून येत आहे.  तनू वेडस मनू या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून १०० टक्के घशघशीत नफा कमावला. याव्यतिरिक्त डीटीएच, सॅटेलाइट,