सुभाष घईंना जमीन परत देण्याचे आदेश

राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.

Updated: Feb 9, 2012, 04:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.

 

 

दिग्दर्शक सुभाष घईं यांची मुक्ता आर्ट ही संस्था आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५  एकर जमीन दिली होती. मात्र हायकोर्टानं ही जमीन परत घेण्याचे आदेश दिल्यानं विलासराव देशमुखांना दणका बसलाय.  २००६ साली १९.५ एकर जमीन राज्य सरकारनं सुभाष घईंच्या मुक्ता आर्टला दिली होती. त्यापैकी १४.५ एकर जमीन सरकारनं परत घ्यावी आणि उरलेली ५ एकर जमीन २०१४पर्यंत सुभाष घई यांच्याकडेच ठेवण्याचं हायकोर्टानं आदेश दिलेत.

 

 

५ एकर जमीन ठेवण्याच येईल तोपर्यंत बाजारभावाप्रमाणं सरकारकडं घई यांना भाडे जमा करावे लागणार आहेत. याप्रकरणी राज्य सरकार बॅकफूटवर गेलं असलं तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावर मुळमुळीत प्रतिक्रिया दिलीय. कोर्टाचा निर्णय जनहिताच्या बाजूने  असेल तर लगेच अंमलबजावणी करु, नाहीतर सुप्रीम कोर्टात अपील कर,. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.