गौरव महाराष्ट्राचा.. कोणाचा होणार गौरव

गौरव महाराष्ट्राचा या सांगितिक रिएलिटी शोचं नवं पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हे पर्व खास असणार आहे.. कारण, या पर्वात प्रेक्षकांना मिळणार आहेत काही सरप्राईजेस 12 छोट्या उस्तादांसह रंगणार आहे गौरव महाराष्ट्राचा या रिएलिटी शोचं नवं पर्व.

Updated: Apr 3, 2012, 07:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गौरव महाराष्ट्राचा या सांगितिक रिएलिटी शोचं नवं पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हे पर्व  खास असणार आहे.. कारण, या पर्वात प्रेक्षकांना मिळणार आहेत काही सरप्राईजेस 12 छोट्या उस्तादांसह रंगणार आहे गौरव महाराष्ट्राचा या रिएलिटी शोचं नवं पर्व.

 

तावून सुलाखून, वेगवेगळ्या राऊंड्स पार करुन या 12 जणांची निवड करण्यात आली आहे. आधीच्या पर्वाप्रमाणेच या पर्वातही परीक्षणाची मुख्य जबाबदारी सांभाळणार आहेत स्वराधीश सुरेश वाडकर. तसंच स्वराधीशांना साथ देणार आहेत गायक आनंद शिंदे आणि वैशाली सामंत.

 

तेव्हा वैशाली-आनंद यांची खुमासदार टीपणी, स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्समुळे स्पर्ध रंगतादार होणार असंच चित्र सध्या दिसतं आहे. पण त्यामुळे पुन्हा एकदा गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची मजा प्रेक्षकांना घेता येणार आहे. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनाही आता या नव्या पर्वामधून खूप काही वेगळं अपेक्षित असणार आहे.