www.24taas.com, नवी दिल्ली
योगगुरू बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र आलेत.
जाहीर केल्याप्रमाणे बाबा रामदेव आज पुन्हा एकदा जंतरमंतरवर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्यावरून एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणला बसलेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देत अण्णा हजारे जंतरमंतरवर होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणात सहभागी झालेत. आंदोलनाला बसण्यापूर्वी सकाळी अण्णा आणि बाबा रामदेवांनी राजघाट इथं जावून महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाबा रामदेव आणि अण्णा शेकडो समर्थकांसह जंतरमंतरवर दाखल झालेत. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर 5 हजार लोकांना येण्यास परवानगी दिलीय. यापेक्षा जास्त लोक आल्यास त्यांना मैदानात येण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. उपोषणस्थळी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
यापूर्वीही बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानात भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्यावर उपोषण केलं होतं. त्यावेळी रात्रीतून बाबा रामदेव यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यामुळे आजचं उपोषण महत्वपूर्ण ठरणारयं.