www.24taas.com, नवी दिल्ली/मुंबई
सरकारने जनतेचा आवाज ऐकण्यास नकार दिल्यामुळंच उपोषण सोडण्याचा निर्णय घेऊन राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याचं स्पष्टीकरण टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी दिलंय.
लोक रस्त्यावर उतरली तरी सरकारला काहीही फरक पडत नाही. सरकारचा अहंकार वाढला असून दादागिरीची भाषा करत असल्यानं अण्णांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं सिसोदियांनी सांगितलंय. तसंच राजकीय पक्ष स्थापण्याची आताच घाई नसल्याचंही सिसोदिया यांनी स्पष्ट केलंय. अण्णा आज संध्याकाळी पाच वाजता उपोषण सोडणार आहेत.
भ्रष्टाचार आणि लोकपालच्या मुद्यावर सरकार दखल घेत नसल्यानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी काल जंतरमंतरवरुन राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं येणा-या निवडणुकांमध्ये अण्णाही इतर नेत्यांप्रमाणं प्रचारसभा गाजवताना दिसतील. त्यांच्या या निर्णयामुळं टीम अण्णाची ही नव्यानं सुरुवात ठरणार की शेवट. याचा निर्णयही येणा-या काही दिवसांत दिसणाराय. अण्णांनी गेल्या वर्षी लोकपालसाठी देशभरात उभं केलेलं आंदोलन आणि त्याला जनतेचा मिळालेला पाठिंबा. यावर्षी मात्र ओसरत चाललेलाच दिसला. त्यामुळं टीम अण्णाला आंदोलनासाठी पाठिंबा देणारे हात, मतदानावेळी टीम अण्णाला मात्र हात दाखवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळं एका आंदोलनाचा शेवटही होऊ शकतो. परिणामी यामध्ये लोकपाल बिलाचं काय होणार. हाही प्रश्न उरतोच.
भाजपची ऑफर
अण्णा हजारे राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्यानं त्यांना राजकीय पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झालीय. अण्णांनी भाजपमध्ये येण्याची पहिली ऑफर आलीय. दुसरीकडे टीम अण्णा आपलं उपोषण आज सोडणाराय. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या हस्ते टीम अण्णा उपोषण सोडणाराय. साता-यात भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय बालकाचे लचके तोडल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
अण्णांनी राजकीय मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांना राजकीय पक्षांच्या ऑफर्स येवू लागल्या आहेत. अण्णांना पहिली ऑफर भाजपकडून आलीय. अण्णांना राजकारणात यायचे असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे अशी खुली ऑफर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी दिलीय. अण्णांना भाजप सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. त्यामुळं अण्णा आता भाजपच्या प्रस्तावावर काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता लागलीय.
अण्णांच्या भूमिकेला खैरनारांचा विरोध
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर, आता अण्णांच्या सहका-यांमधूनच त्याला विरोध होतोय. अण्णांना अनेक आंदोलनांमध्ये सोबत करणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे माजी अधिकारी गो.रा.खैरनार यांनीही अण्णांच्या या भूमिकेला विरोध केलाय