अन्सारी पुन्हा उपराष्ट्रपती

हमीद अन्सारी पुन्हा एकदा भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवडून आले आहेत. यूपीएचे उमेद्वार असलेल्या अन्सारींनी एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांचा पराभव केलाय.

Updated: Aug 8, 2012, 07:28 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

हमीद अन्सारी पुन्हा एकदा भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवडून आले आहेत. यूपीएचे उमेद्वार असलेल्या अन्सारींनी एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांचा पराभव केलाय.

 

आज झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ७०० पेक्षा जास्त लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांनी मतदान केलं. यामध्ये हमीद अन्सारी यांना 490 मतं तर जसवंत सिंह यांना 238 मतं मिळाली आहेत.

 

सकाळी १० वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराला ३९५ मतांची गरज होती. सपा, बसपा आणि डाव्या पक्षांचा पाठिंब्यामुळे अन्सारी यांनी हा आकडा सहज पार केलाय. मतांचं बलाबल पाहता हमीद अन्सारी यांचं पारडं जड असल्याचं चित्र अगोदरपासून स्पष्ट होतं. हमीद अन्सारी यांच्या विजयानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय. या विजयामुळे हमीद अन्सारी यांना दुसऱ्यांदा भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा मान मिळालाय. लोकसभेचे ५४५ आणि राज्यसभेचे २४५ मिळून ७९० सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.