एलपीजी गॅसचा घोटाळा थांबविणार वेबसाइट!

स्वयंपाकाच्या गॅस संदर्भात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी पोर्टलची स्थापन केली आहे. याद्वारे देशातील १४ कोटी घरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसची इत्यंभूत माहिती आता उपलब्ध होणार आहे. या पोर्टलद्वारे ग्राहक आपली तक्रारही दाखल करू शकणार आहे.

Updated: Jun 22, 2012, 06:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

स्वयंपाकाच्या गॅस संदर्भात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी पोर्टलची स्थापन केली आहे. याद्वारे देशातील १४ कोटी घरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसची इत्यंभूत माहिती आता उपलब्ध होणार आहे. या पोर्टलद्वारे ग्राहक आपली तक्रारही दाखल करू शकणार आहे.

पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री जयपाल रेड्डी यांनी या पोर्टलचे उद्घाटन केले. या पोर्टलद्वारे ग्राहक अधिक जागरूक होईल. तसेच सिलेंडर पुरवठ्यात पारदर्शकता निर्माण होण्यात मदत होणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कोर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी हे वेब पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून १४ कोटी घरांमध्ये सिलेंडरच्या साठा, पुरवठ्यासंदर्भात माहिती उपलब्ध होणार आहे. यात सिलेंडरचा उपयोग, बुकिंगची स्थिती, रिफीलची मागील माहिती, कनेक्शन परत करणे तसेच मिळत असलेल्या अनुदानाची माहितीही मिळणार आहे.

Tags: