ऑलिंपीक संघटनेच्या हरकतीनंतर 'डाऊ' बॅकफूटवर

डाऊ केमिकलने लंडनच्या ऑलिंपीक स्टेडियमच्या सभोवताली लोगो काढण्याचे मान्य केलं आहे. पण त्याने इंडियन ऑलिंपीक असोशिएशन समाधानी झालं नाही. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डाऊने २०१२ सालच्या ऑलिंपीकचे प्रायोजकपद काढून घ्यावं असं इंडियन ऑलिंपीक असोशिएशनचे मत आहे.

Updated: Dec 18, 2011, 06:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

डाऊ केमिकलने लंडनच्या ऑलिंपीक स्टेडियमच्या सभोवताली लोगो काढण्याचे मान्य केलं आहे. पण त्याने इंडियन ऑलिंपीक असोशिएशन समाधानी झालं नाही. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डाऊने २०१२ सालच्या ऑलिंपीकचे  प्रायोजकपद काढून घ्यावं असं इंडियन ऑलिंपीक असोशिएशनचे मत आहे.

भोपाळच्या वायु गळतीशी डाऊचा संबंध असल्याने इंडियन ऑलिंपीक असोशिएशनने त्यांच्या प्रायोजकत्वाला हरकत घेतली आहे. डाऊने प्रायोजकपदाचे हक्क सोडण्याचे मान्य केलं आहे.  ऑलिंपीकच्या मुख्य स्टेडियमवर लोगो लावण्याचं कंत्राट डाऊने मागे घ्यावं अशी मागणी मजूर पक्षाचे खासदार किथ वाझ यांनी केली होती.

भोपाळमध्ये डिसेंबर १९८४ साली झालेल्या वायु गळतीत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यूनियन कारबाईड इंडिया लिमिटेडच्या कारखान्यातून विषारी वायूच्या गळतीने भोपाळ उध्वस्त झालं होतं. डाऊने २०११ साली यूनियन कारबाईड विकत घेतली. भोपाळच्या वायूगळतीशी संदर्भात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास डाऊने नकार दिला. गळती झाली तेंव्हा यूनियन कारबाईडची मालकी आपल्याकडे नसल्याचं कारण त्यासाठी डाऊने दिलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x