टीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारले

टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये

Updated: Jul 5, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर टीम अण्णांचे सदस्य मात्र उपोषणावर ठाम असून, प्रसंगी तुरुंगात उपोषणाची तयारी त्यांनी दर्शवलीय.

 

टीम अण्‍णांनी दिल्‍ली पोलिसांकडे जंतर-मंतरवर 25 जुलै ते 8 ऑगस्‍टपर्यंत उपोषणाची परवानगी मागितली होती. टीम अण्‍णांच्‍या उपोषणावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे. या काळात देशातील वेगवेगळया संघटना जंतर-मंतरवर येऊन विरोध प्रदर्शन आणि धरणे आंदोलन करीत असतात.

 

तसेच जंतर-मंतर हे छोटे मैदान आहे. मैदानावर गडबड होऊन चेंगराचेंगरी झाल्‍यास पोलिसांना लोकांना मदत करण्‍यास कठीण जाईल. त्‍यातच पोलिसांना या संघटनांना जागा उपलब्‍ध करून द्यावयाची आहे. त्‍यामुळे टीम अण्‍णांना बेमूदत उपोषणास परवानगी देऊ शकत नसल्‍याचे पोलिसांनी टीम अण्‍णांना दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

 

दिल्‍ली पोलिसांनी टीम अण्‍णांना चर्चेसाठी बोलावले आहे. टीम अण्‍णांना जर २५ जुलै ते ८ ऑगस्‍टपर्यंत उपोषणास परवानगी न मिळाल्‍यास उपोषणाचा कार्यक्रम बदलून देशभर जेलभरो आंदोलन करण्‍यात येईल.

 

[jwplayer mediaid="133856"]