प्रणव मुखर्जी होणार राष्ट्रपती?

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीची दिल्लीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

Updated: Jun 9, 2012, 10:23 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीची दिल्लीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

पुढच्या आठवड्यात काँग्रेसकडून त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी युपीएच्या घटक पक्षांशी चर्चा करणार आहे. काँग्रेस सुत्रांकडून ही माहीती देण्यात आली आहे.

काँग्रेसची राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी झालेली आहे. प्रणव मुखर्जींची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून प्रणव मुखर्जी हे दिसणार आहेत.  पुढच्या आठवड्यात उमेदवारी जाहीर होणार आहे. उमेदवार म्हणून प्रणवदांचे नाव आघाडीवर आहे. युपीएच्या घटक पक्षांशी काँग्रेस चर्चा करणार आहेत. तर प्रणवदा राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार का हे देखील महत्त्वाचं आहे.