भाजप मंत्री सोमण्णांना चप्पलेचा 'प्रसाद'

भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली. मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता.

Updated: Oct 9, 2011, 01:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, बंगळुरू

 

भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली.

 

मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता. महापालिकेत स्थान न मिळाल्याने हा कार्यकर्ता नाराज होता. प्रसाद याने यावेळी पक्षाच्या विरोधात सोमण्णा यांनी निर्णय घेतल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले.

 

प्रसाद याला अटक करण्यात आली असून, जनप्रतिनिधीवर हल्ला करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. प्रसाद हा बंगळुरुमध्ये रियल एस्टेट एजंट आहे.