'मारन' यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

2 जी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दयानिधी मारन यांच्या चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतल्या घरांवर सीबीआयनं छापे घातले आहेत. मारन यांच्या कार्यालयांवरही छापे घालण्यात आले आहेत. या सर्व व्यवहारात दयानिधी यांचे बंधू आणि सन टीव्हीचे सर्वेसर्वा कलानिधी मारन यांनाही फायदा झाल्याचं बोललं जातय.

Updated: Oct 11, 2011, 08:26 AM IST

झी २४ तास वेब टीम, चेन्नई

2 जी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दयानिधी मारन यांच्या चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतल्या घरांवर सीबीआयनं छापे घातले आहेत. मारन यांच्या कार्यालयांवरही छापे घालण्यात आले आहेत. तत्कालीन दूरसंचारमंत्री असताना मारन यांनी मलेशियाच्या मॅक्सिस कंपनीला फायदा पोहचवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे एअरसेल आणि मॅक्सिसच्या व्यवहारात मारन यांनी मॅक्सिसला स्वस्तात शेअर विकण्यासाठी एअरसेलवर दबाव आणल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या सर्व व्यवहारात दयानिधी यांचे बंधू आणि सन टीव्हीचे सर्वेसर्वा कलानिधी मारन यांनाही फायदा झाल्याचं बोललं जातय. त्यामुळं दयानिधी मारन यांच्यासह कलानिधी मारन, मॅक्सिसचे मालक आनंदकृष्णन आणि एस्ट्रो ऑल एशिया नेटवर्कचे सीईओ राल्फ मार्शल यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं यासर्वांसह मारन यांनाही अटक होण्याची शक्यता असून मारन यांनाही तिहार जेलची हवा खाली लागणार असल्याचं चित्र दिसतंय.

Tags: