रेल्वे प्रवासात ओळखपत्र सक्तीचे

१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.

Updated: Jan 18, 2012, 02:45 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

सावधान ! तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर आता खबरदारी घ्यावी लागेल. कारण वातानुकूलीत (एसी) डब्यातून प्रवास करताना तुमच्याकडे तिकीट असतानाही खाली उतरावे लागेल. तशी व्यवस्था रेल्वेने केली आहे. मात्र, घाबरू नका. ओळखपत्र असेल तर हा धोका आपल्याला पत्करावा लागणार नाही.

 

१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्यांना आपल्या पसंतीचे ओळखपत्र, मतदान कार्ड, ड्रायव्हींग लायसन आदींचा समावेश असेल.

 

रेल्वे तिकिट दलालांवर यामुळे अंकुश बसेल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच रेल्वे तिकिटाचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल. अनेकवेळा दुसऱ्याच्या नावावर रेल्वे प्रवास केला जातो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. काहीवेळा रेल्वे तिकिट दलालांकडून असे प्रकार घडत असल्याची घटना घडली आहे. त्याला कुठेतरी चाप बसेल, असे रेल्वे मंत्रालयाला वाटत आहे.