लोकपालला घटनात्मक दर्जा नाही

सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकला घटनात्मक दर्जा मिळू शकलं नाही. या संदर्भात विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक असलेलं संख्याबळ नसल्याची हरकत सभापती मीराकुमारांकडे नोंदवली.

Updated: Dec 28, 2011, 03:03 PM IST

 झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकपाल विधेयक आवाजी मतदानाने संमत झालं असलं तरी  सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकला  घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही. या संदर्भात विरोधी पक्ष नेत्या  सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक असलेलं  संख्याबळ नसल्याची हरकत सभापती मीराकुमारांकडे नोंदवली.  घटना दुरुस्ती विधेयकही संमत होऊ शकलं नाही. व्हिसल ब्लॉअर  विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं.

 

घटनात्मक दर्जा मिळू  न शकल्याने  सत्ताधारी पक्षाची मोठी हार  झाली आहे. काँग्रेसचे महासचिव राहूल गांधी यांनी मागच्या वेळेस  लोकसभेत लोकपालला घटनात्मक दर्जा मिळावा अशी मागणी  केली होती. या संदर्भात लोकशाहीसाठी हा दुख:द दिवस असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली आहे. लोकपालशी संबंधित तीन दुरुस्त्याही संमत होऊ शकल्या नाही.