शरद पवार नाराज, राजीनामा देण्याची शक्यता!

ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Updated: Jul 19, 2012, 10:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे.  प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला शरद पवार अनुपस्थित राहिले. ज्येष्ठता डावलल्याने शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे. प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातील सर्वात अनुभवी मंत्री शरद पवार आहेत. मात्र त्यांचे हे स्थान डावलून त्यांच्याजागी ए. के. अँटोनी यांची वर्णी काँग्रेसकडून लावण्यात आलीय़. यामुळं पवार नाराज असल्याची चर्चा आहे.

आज पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही कॅबिनेट बैठकीला दांडी मारली.. त्यानंतर याप्रकरणी पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर कोणतीही नाराजी नाही, असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. जे ही प्रश्न असतील ते चर्चेनं सोडविले जातील असंही पटेल यांनी स्पष्ट केलंय.