शरद पवार यांच्यावर दिल्लीत हल्ला

दिल्लीमध्ये हरविंदर सिंग नामक युवकाने केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकावली.

Updated: Nov 24, 2011, 09:55 AM IST


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

दिल्लीमध्ये हरविंदर सिंग नामक युवकाने केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकावली.

 

पवार हे गाडीतून उतरत असताना हरविंदर सिंग याने शरद पवारांवर हात उचलला. तसंच त्याने चाकूही काढला होता. मात्र, त्याला वेळीच ताब्यात घेण्यात आलं आहे. हरविंदर सिंगने याआधीही सुखराम यांच्यावर हात उचलेला होता.

 

हल्ल्याचा सर्वत्र निषेध
शरद पवार यांच्यावरील हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पुणे, बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. कार्यकर्ते रस्यावर उतरल्याने सोलापूर, मोहोळ वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राजकीय क्षेत्रातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. हल्ल्याचा पंतप्रधानांनी निषेध केला आहे.