सराफ व्यापाऱ्यांचा संप मागे

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशभरातील सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला संप२१ दिवसानंतर आज शुक्रवारी मागे घेतला.

Updated: Apr 6, 2012, 10:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी  यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशभरातील सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला संप२१ दिवसानंतर आज शुक्रवारी मागे घेतला. या संपामुळे सुमारे २० हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

 

 

सोन्यावरील आयात कर वाढविणे आणि अनब्रॅंडेड दागिन्यांवर उत्पादन शुल्क लागू करण्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी संप पुकारला होता. संपाबाबत तोडगा निघण्य़ाची शक्यता नव्हती. त्यामुळे तब्बल २१ दिवस संप सुरू होता. आज सराफ व्यावसायिकांनी  सोनिया गांधी आणि  प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत उत्पादन शुल्क कमी करण्याबाबत संसदेत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी  संप मागे घेतल्याची घोषणा केली.
अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर दोन टक्‍क्‍यांवरून चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढविला होता. ब्रॅंडेड दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क आकारला जातो, तो कर अनब्रॅंडेड दागिन्यांना लागू करण्याची तरतूद अर्थसंकल्पात  मुखर्जी यांनी केली होती. या निर्णयावर सराफ व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ऑल इंडिया ज्वेलर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सराफ व्यावसायिकांनी बंद पुकारला होता. बंद दरम्यान सराफ व्यावसायिकांनी देशात आंदोलने केली होती. काही ठिकाणी रस्तारोको आणि रेल्वे रोकली होती. त्यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता लक्षात घेवून आजची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

सरकारनं कस्टम ड्युटी ४ टक्के केल्यानं सराफ व्यापारी नाराज होते. याचा फटका ग्राहकांनाही बसणार आहे. कारण सोन्याची किंमत वाढणार आहे. गेल्या जानेवारीमध्ये सरकारनं सोन्यावर २ टक्के आयात शुल्क वाढवलं होतं. १० ग्रँम सोन्यावर ३०० रुपये आयात शुल्क वसुल केले जायचे. सोन्याची आयात घटली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. कस्टम ड्युटी ४ टक्के केल्य़ानं आयातीवर परीणाम होणार आहे. २०११ मध्ये ९६९ टन सोन्याची आयात झाली होती. तर २०१२ मध्ये त्यात घट होऊन ५०० टन झाली.

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="78499"]