उस्मानाबादमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या

उस्मानाबादमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यानं ही आत्महत्या केली आहे. रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात यावं अशी त्याची मागणी होती.

Updated: Apr 1, 2012, 02:18 PM IST

www.24taas.com, उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यानं ही आत्महत्या केली आहे. रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात यावं अशी त्याची मागणी होती.

महादेव उदागे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील पाचवड ते तांदळवाडी या योजनेतील रस्ता पूर्ण करण्यात यावं यासाठी आंदोलन सुरू होतं. मात्र शासनदरबारी उपेक्षाच झाल्याने अखेर महादेव उदागे यांनी आत्महत्या केलीय. आठ दिवसांपूर्वी उदागे यांनी प्रशासनाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

[jwplayer mediaid="75591"]