केज निवडणूक: संगीताची सांगता, 'पृथ्वी'चे राज

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्यात सरळ लढत असल्याचं दिसून येतंय. १२ व्या फेरीअखेर पृथ्वीराज साठे जवळजवळ ५५०० मतांनी आघाडीवर आहेत.

Updated: Jun 16, 2012, 12:47 PM IST

 www.24taas.com, बीड  

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडलीय. यामध्ये राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठेंनी भाजपच्या संगीता ठोंबरे यांचा  ८,६४१ मतांनी पराभव करून गड राखलाय.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीला संगीत ठोंबरे आघाडीवर होत्या. ५व्या फेरीअखेर ठोंबरे ५२३७ मतांनी आघाडीवर होत्या. पण सुरुवातीच्या या आघाडीनंतर मात्र भाजपची पिछेहाट झाली.  राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांनी मोठी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवलीय.

 

अशी झाली मतमोजणी :

- ७ व्या फेरीअखेरी - राष्ट्रवादीचे पृथ्वीराज  साठे यांना ३७८० मतांची आघाडी

- १० व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे   यांना ६०० मतांची आघाडी

- ११ व्या फेरीअखेर  - पृथ्वीराज साठे   यांना ४२००  मतांची आघाडी

- १२ व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे  यांना ५५०० मतांची आघाडी

- १५ व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे  यांना ३५०० मतांची आघाडी

- १७ व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे  यांना ५३०० मतांची आघाडी

- २० व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे  यांना ३,७००  मतांची आघाडी

- २१व्या फेरीअखेर - पृथ्वीराज साठे  ५,२०० मतांनी आघाडीवर होते

मात्र, शेवटच्या फेरीअखेर पृथ्वीराज साठेंनी तब्बल ८,६४१  मतांची आघाडी घेऊन ठोंबरेंचा पराभव केलाय.

..

या निवडणुकीसाठी तब्बल २० उमेद्वार रिंगणात दाखल झाले होते. पण  राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्यात सरळसरळ ही लढत झाल्याचं स्पष्ट दिसून आलं. भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला प्रतिष्ठेचा संघर्ष पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विमल मुंदडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. एकूण ३ लाख ७ हजार ७२ मतदार असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात ३६६ मतदान केंद्रांवर ही निवडणूक पार पडली. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती.

.

.