वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुया माता मंदिरातमहाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदी मधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Updated: Apr 14, 2012, 02:07 PM IST

www.24taas.com, आंजी 

 

 

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुयामाता मंदिरात महाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदीमधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

 

वर्ध्या जवळील  आंजी गावात शुक्रवारी रात्री उशीरामहाप्रसाद खाल्ल्याने सुमारे चारशे जणांना विषबाधा झाल्याचे सुरूवातीला सांगण्यात येत होते. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु   आहेत.वर्ध्या जवळील आंजी गावात माता अनुसुयेचे मंदिर आहे. तिथे शुक्रवारी रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

या महाप्रसादाला सुमारे सहा हजाराच्या वर भाविक उपस्थित होते. महाप्रसादानंतर चारशे लोकांना घरी गेल्यावर मळमळ , उलट्या आणि हगवण याचा त्रास होऊ लागला. यातील शंभर जणांना आंजी येथील ग्रामीण रुग्णालयात, शंभर रुग्णांना वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात तर पन्नास जणांना वर्ध्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे..