नकली सोनं विकणारे गजाआड

शुध्द सोन्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रतन राठोड आणि अशोक राठोड अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून १ किलो बनावट पितळी धातूची बिस्कीटं जप्त केली आहेत.

Updated: Feb 7, 2012, 08:26 AM IST

प्रविण नलावडे, www.24taas.com, वसई

शुध्द सोन्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रतन राठोड आणि अशोक राठोड अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून १ किलो बनावट पितळी धातूची बिस्कीटं जप्त केली आहेत.

एखाद्या मोठ्या ग्राहकाला हेरून शुद्ध सोनं देतो असं सांगून ते आपल्या जाळ्यात ओढायचे. खोदकाम करताना एक किलो सोन्याची बिस्कि टं मिळाल्याचं सांगत ते लोकांना फसवायचे. ग्राहकाशी सौदा करण्यासाठी ते खरं सोनं दाखवायचे. मग विश्वास बसल्यावर मग मालाची डिलीव्हरी करताना ते नकली सोनं द्यायचे. एका ग्राहकाला संशय आल्यावर त्यानं पोलिसांना फोन केला मग राठोडचं बिंग फुटलं.

दोघेही आरोपी मुळचे राजस्थानचे आहेत. त्यांच्यासोबत एक महिलाही असते. सध्या ती फरार आहे. या दोघांकडून एक किलोची बनावट पितळी धातूची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहेत. सोन्याच्या बहाण्यानं किती जणांना त्यांनी गंडवलं आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.