पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.

Updated: Jun 18, 2012, 10:48 AM IST

www.24taas.com, सिंधुदुर्ग /ठाणे /मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.

ठाण्यातही मान्सून 

ठाण्यातही मान्सून दाखल झाला आहे. वर्तकनगर, घोडबंदर आणि लोकमान्य नगर भागात चांगलाच पाऊस झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाल्यानं ठाणेकरही सुखावले. अंबरनाथ ,बदलापूर ,कल्याण परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासून पडणा-या पावसामुळे कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. आता वाहतूक धीम्यागतीने सुरु झालीय. हायवे वर पाणीच पाणी असल्याने जड वाहनांच्या सुमारे अर्धा ते एक किलो मीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर कायम असल्याने ब-याच वेळ हीच परिस्थिती हायवे वर होती. अंबरनाथ परिसरात बी केबिन, नवरेनगर, कमलाकरनगर, जावसई या भागात नागरिकांच्या घरात पाणी साचले.

मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत अखेर मान्सून दाखल झाला.  पुढच्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा वेधशाळेनं दिलाय....शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरु आहेत....हर्णे इथं आठ दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सून अखेर पुढे सरकला आणि त्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपवली.... सकाळपासून पावसाचा जोर होता. मोसमी पावसानं महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आठवडभराहून अधिक काळ विश्रांती घेतली. मात्र आता वातवरणात अनुकूल बदल होऊ लागले आहेत.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मान्सून दाखल झाला. दिवसभरात शहरासह नवी मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस झाला. हर्णेजवळ मान्सून अडकल्यानं चिंतेचं वातावरण होतं. मात्र पावसानं दमदार हजेरी लावत मुंबईकरांना दिलासा दिला दिला. येत्या 48 तासांत मुंबईत जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. वरळी सी फेसवर तरुणांनी पावसाचा आनंद लुटला.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="122621"]