राणेंना 'दे धक्का'

सिंधुदुर्गात नारायण राणे यांना आणखी एक धक्का बसला आहे. वेंगुर्ल्यात झालेल्या हाणामारीनंतर स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या कोंडीत सापडलेल्या नारायणा राणे यांना राज्य निवडणूक आयोगाने जोरदार धक्का दिला आहे.

Updated: Dec 10, 2011, 04:53 AM IST

झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गात नारायण राणे यांना आणखी एक धक्का बसला आहे. वेंगुर्ल्यात झालेल्या हाणामारीनंतर स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या कोंडीत सापडलेल्या नारायणा राणे यांना राज्य निवडणूक आयोगाने जोरदार धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यव्यस्थेचा अहवाल मागवलेला आहे.

 

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग  जिल्हा अतिसंवेदनशिल म्हणून घोषित करण्याची मागणीही मित्रपक्ष राष्ट्रवादीने केली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल मागवला आहे, अहवाल मिळाल्यास निवडणूक आयोग यावर निर्णय घेणार आहे.

 

त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुध्द राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला आहे. वेंगुर्ल्यांतील हिंसाचाराचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर राणे होमपिचवर अडचणीत सापडले आहेत.