शिक्षकांनीच केली शाळेची तोडफोड

नोकरीच्या आशेने आलेल्या ५००च्या वर उमेदवारांनी केली मुलाखतीच्या ठिकाणी तोडफोड केली. कल्याणमधील कर्णिक रोड परिसरात ही घटना घडली. वृत्तपत्रातली नोकरी संदर्भातील जाहिरात पाहून मुलाखतीसाठी ५५० च्या वर तरुण आले होते.

Updated: May 19, 2012, 11:44 PM IST

www.24taas.com, कल्याण

 

नोकरीच्या आशेने आलेल्या ५००च्या वर उमेदवारांनी केली मुलाखतीच्या ठिकाणी तोडफोड  केली. कल्याणमधील कर्णिक रोड परिसरात ही घटना घडली. वृत्तपत्रातली नोकरी संदर्भातील जाहिरात पाहून मुलाखतीसाठी ५५० च्या वर तरुण आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मुलाखतीच्या ठिकाणी गोंधळ घातला. सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दिलीप पाटील या संस्था चालकाला ताब्यात घेतलं आहे.

 

एका मराठी दैनिकात कल्याणी एज्युकेशन सोसायटी या संस्थेने नोकरभरतीची जाहीरात दिली होती. बाल विकास विद्यामंदिर तसेच स्वामी समर्थ माध्यमिक शाळेसाठी शिक्षक आणि कर्मचारी पदाच्या १९ जागांसाठी मुलाखत होती.  कर्णिक रोड परिसरातील ताकवणे सदन या मुलाखतीच्या ठिकाणी सुमारे अनेक उमेदवार शुक्रवारी रात्रीपासूनच हजर झाले होते. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीस सुरवात होण्याआधीच या जागा पैसे घेऊन भरण्यात येत असल्याचं उमेदवारांच्या लक्षात आलं. ज्या शाळांसाठी मुलाखत होत्या. त्या शाळाच  गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत.

 

ही माहिती मिळताच  उमेदवारांनी मुलाखती घेणाऱ्या संस्था चालकांना जाब विचारला. संस्थाचालक पाटील यांनी आपली शाळा कल्याण पूर्वेतील कचोरे येथे सुरु होणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे उमेदवारांच्या लक्षात आली. त्यांनी तेथील सामानाची तोडफोड केली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.  पोलिसांनी  घटनास्थळी जाऊन उमेदवारांना शांत केले. संस्थाचालक दिलीप पाटील याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. महात्मा फुले पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.