Horoscope Navratri 2024 in Marathi : शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हे नवरात्र यावेळी खूप खास असणार आहे. संपत्तीचा कारक शुक्रमुळे केंद्र त्रिकोण आणि त्यासोबत मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हे दोन राजयोग वरदान ठरणार आहे. या लोकांवर दुर्गा मातेची अपार कृपा बरसणार आहे. या लोकांचे बँक बॅलेन्स प्रंचड वाढणार आहे. चला मग जाणून घ्या यात तुमची रास आहे का? (Horoscope Navratri 2024 Center kendra tirkon rajyog in Navratri These zodiac sign people will be unimaginable wealth)
कन्या राशीत सूर्यग्रहण झाल्यानंतर नवरात्रीपासून या लोकांची भाग्य उजळणार आहे. केंद्र त्रिकोण राजयोग या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या धन आणि वाणी स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसंच या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधाणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार असून हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर असणार आहे. तुमचं अनेक अपूर्ण प्रकल्प यावेळी मार्गी लागणार आहे. तर भविष्यात तुम्हाला त्यांचा मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे. तसंच, या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोगाची शुभ ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून सातव्या भावात असणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे वैवाहिक जीवन खूप छान जाणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. तसंच, शुक्र ग्रह हा तुमच्या राशीच्या धन घराचा स्वामी असल्यामुळे या काळात तुमचे बोलणे प्रभावी ठरणार आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात खूप सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. हे संक्रमण परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर असेल. तसंच या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा मिळणार आहे.
केंद्र त्रिकोन राजयोग तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण शुक्राचे संक्रमण तुमच्या राशीतून नवव्या घरात असणार आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. नोकरदारांना लाभाची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना चांगली नोकरी मिळणार आहे. लोकांच्या करिअरसाठी वेळ खूप अनुकूल असणार आहे. या काळात त्यांना सर्व प्रकारचे भौतिक सुख लाभणार आहे. तसंच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करणार आहात. तसंच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)