लतादीदी आणि आशाताईंबद्दल आदर मला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक आणि सांगितिक आदर आहे. मी पेडर रोड पुलाबद्दल बोललो, त्यात सचिन तेंडुलकर, लतादीदी किंवा आशाताईंचा प्रश्नच कुठे येतो, सचिनला महाराष्ट्राचा मानचिन्ह म्हणतात तर त्याला नव्या घरात प्रवेश करतांना दंड का ठोठावला, असा खवचट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकाला उत्तर देताना केला आहे.
सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीवएफएसआय देण्याची मागणी ज्यांनी केली ‘ तेच ’ लोक पेडर रोड पुलाच्या निमित्ताने लता मंगेशकर , आशा भोसले यांना टीकेचे लक्ष्य करतात याचे आश्चर्य वाटते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पण आतापर्यंत त्यांनी जे हास्यास्पद पत्रक काढले आहेत, त्यांचे हे पत्रक अतिशय हास्यास्पद आहे. सचिनने नियमाप्रमाणे एफएसआयसाठी पत्र पाठवले होते . कोणतेही बेकायदा कृत्य केले नव्हते. तो ‘ ओसी ’ नसताना घरात राहण्यासाठी गेला हे खरे आहे पण त्यासाठी त्याने दंड भरला आहे. त्यामुळे पेडर रोडच्या पुलाचे निमित्त करुन तेंडुलकर ‘वर्सेस’ मंगशेकर अशी मॅच आहे का ही? असा प्रश्नही त्यांनी केला.
पेडर रोड भागातून दररोज लाखभर गाड्या जातात , पुढे वाहतूक कोंडी होते. या समस्येवर उत्तर म्हणून पेडर रोडवर पूल बांधणे गरजेचे असेल तर पूल बांधावा एवढेच मी म्हणालो . परळमध्ये आशाताईंच्या घराजवळच उड्डाणपूल आहे. त्यापुलाला कधी विरोध केला नाही मग पेडर रोडच्या पुलाला विरोध का?, असा प्रश्न मी उपस्थित केला. तसेच लतादीदी आणि आशाताई यांना पुढे करुन पेडर रोडचे उच्चभ्रूस्वार्थ साधत आहेत, असा आरोप केला. यात लतादीदी किंवा आशाताई यांच्यावर चिखलफेक करण्याचा उद्देश नव्हता. शिवसेना काही तरी बोलायचे म्हणून बोलत आहे. त्यांचे पत्रक पाहिल्यावर यांना नियम, कायदे समजतात की, नाही असा प्रश्न पडतो.
सरकार त्यांचे निर्णय घेईल, पूल वगैरे प्रश्नात कोणी लक्ष घालण्याची गरज नाही, अशी शिवसेनेची भूमिका असेल तर ते जैतापूरमध्ये तरी सरकार विरोधात कशाला आंदोलन करत आहेत? कशाला कापूस प्रश्नी दिंड्या कसल्या काढताहेत , असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरेंची फटकेबाजी भाग - १
[jwplayer mediaid="12030"]
राज ठाकरेंची फटकेबाजी भाग - २
[jwplayer mediaid="12043"]
राज ठाकरेंची फटकेबाजी भाग - ३
[jwplayer mediaid="12054"]