अभिनव गांधीगिरी, रुग्णांवर मोफत उपचार

चंद्रपूरचे प्रस्तावित शासकीय महाविद्यालय सातारा जिल्ह्यात हलवण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.

Updated: Feb 21, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

 

चंद्रपूरचे प्रस्तावित शासकीय महाविद्यालय सातारा जिल्ह्यात हलवण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेने अभिनव गांधीगिरी आंदोलन करत प्रतिकात्मक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

 

अधिष्ठाता कक्ष, पुरुष-महिला वॉर्डस, अपघात कक्ष, प्रसूती कक्ष इत्यादी वेगवेगळे कक्ष या आंदोलनाच्या निमित्ताने या प्रतिकात्मक शासकीय महाविद्यालयात उभारण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात चंद्रपूर IMAच्या  डॉक्टरांनी रुग्णांवर मोफत उपचार केले.

 

गेले दोन महिन्यांपासून सरकाच्या या निर्णयाचा अशाप्रकारे छोट्या छोट्या आंदोलनाची मालिका राबवत विरोध सुरु आहे. दरम्यान शासकीय महाविद्यालय चंद्रपुरात तातडीने परत सुरु करण्याची मागणी करण्यात येते आहे.