www.24taas.com, गडचिरोली
गडचिरोलीत सुरक्षा दलांना नक्षलग्रस्तांशी मुकाबला करण्याबरोबरच नक्षलग्रस्तांच्या भीतीपोटी हिम्मत खचलेल्या ग्रामस्थांचं प्रबोधन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. दुर्गम भागात अनेक ठिकाणी CRPF ने आपले बेस कॅम्प उभारलेत आणि नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कल्पक योजना राबवल्या जात आहेत.
नक्षलग्रस्त गडचिरोलीतल्या जारावंडी या अतिदुर्गम परिसरात CRPF ने स्थानिकांशी आणि विशेषतः तरुणांशी नाळ जोडण्यासाठी सायकल रेसचं आयोजन केलं होतं. गेल्या 2 वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या हल्ल्यांना सामोरं जाण्यासोबतच स्थानिकांचा विश्वास संपादन करण्याचं काम CRPFचे जवान करत आहेत. त्यासाठी अशा अतिदुर्गम भागात जवानांनी अशी उपक्रमांची मालिका सुरु केली आहे.
यापुढेही नक्षल चळवळीची शक्ती आणि कमकुवत स्थानं ओळखून त्यानुसार धोरणं आखण्याचं उद्दिष्टय या दलानं बाळगलंय. नक्षली हल्ले परतवण्यासाठी स्थानिकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. पण इतक्यावरच न थांबता त्यांना नक्षली चळवळीचं वास्तव सांगणं आणि हळूहळू विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीचं CRPFचे हे कृतीशील प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.