www.24taas.com, गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून त्यांचा तपास लागलेला नाही.
विशेष म्हणजे सरपंच पोरेट्टी हे नक्षलसमर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील इस्तारी गावात सोमवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 15 ते 20 नक्षलवाद्यांनी सरपंचांच्या घरी घुसून त्यांचे अपहरण केलं.
परंतु अपहणानंतरही त्यांच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय.