वर्धा जिल्ह्यातील आर्वीत पोलीस स्टेशनच्या पायरीवर आशिष सोमकुंवर या तरुणाने आत्महत्या केली आहे. आशिष सोमकुंवरने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मानमोडे आणि पोलीस वसंत इंगोले विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आशिषची गाडी जप्त केली होती आणि ती सोडविण्यासाठी त्याने पोलिसांना दहा हजार रुपये दिले होते. पण पोलिसांनी आशिषकडे परत पोलीस उप अधीक्षक पुसद यांच्या नावाने पाच हजार रुपयांसाठी तगादा लावला. आशिषने तगाद्याला कंटाळून शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करला. आशिष सोमकुंवर हा भाजपाचा स्थानिक पदाधिकारी आणि ग्राम पंचायत सदस्य होता.