मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण सभाणे या शेतक-याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कापसाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सभाणे यांनी केली होती.

Updated: Dec 4, 2011, 05:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ

मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण सभाणे या शेतक-याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कापसाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सभाणे यांनी केली होती. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची सभा सुरु असतानाच सबाणे यांनी मुख्यमंत्र्यांना कापसाच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. इतकचं नाही त्यांना खाली बसायला सांगितलं. त्यामुळं भर सभेत सभाणे यांनी विष घेतलं. ही बाब लक्षात येताच त्यांना धामणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना यवतमाळला हलवण्यात आलं.

 

दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शेतकरी संघटनेने काळे झेंडे दाखवले. कापसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले असता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांना काळे झेंडे दाखवले. याप्रकरणी पोलिसांनी 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्री पक्षाकरता मते मागत फिरत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.