वर्ध्यात 'आधार'चे काम 'धारदार'

'आधार' नोंदणीत वर्धा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 52 टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करून घेतली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सहा लाख 46 हजार 115 जणांची नोंदणी झाली आहे.

Updated: Oct 2, 2011, 02:34 PM IST

[caption id="attachment_1248" align="alignleft" width="300" caption="वर्ध्यात 'आधार'चे काम 'धारदार'"][/caption]

झी 24 तास वेब टीम, नागपूर

'आधार' नोंदणीत वर्धा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 52 टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करून घेतली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सहा लाख 46 हजार 115 जणांची नोंदणी झाली आहे.

आधार योजनेत नागरिकांना विशिष्ट क्रमांक आणि ओळखपत्र देण्यात येते. या नोंदणीत गडचिरोली आणि जालना जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यात 32 टक्‍क्‍यांपर्यंत नोंदणी झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात 30 टक्के, नागपूर जिल्ह्यात 16 टक्के आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 49 टक्के नोंदणीचे उद्दिष्ट गाठले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी या नोंदणीकरिता स्वतःच पुढाकार घेतल्याने हे उद्दिष्ट गाठता आले, असे आधार नोंदणीचे काम करणारे टेरासॉफ्ट कंपनीचे अमित वाजिये यांनी सांगितले.