हिवाळी अधिवेशन होणार चांगलेच गरम....

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत.

Updated: Dec 12, 2011, 05:16 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत. कापूस उत्पादकांना मदत जाहीर करेपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांच्य़ा या पवित्र्यावर टीका केली आहे.

 

या  इंडिय़ाबुल्सच्या देणगीचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आणखी तीन मंत्र्यांची नावं जाहीर करण्याची घोषणा केली. या तीनही मंत्र्यांच्य़ा खासगी ट्रस्टला देणगीच्या स्वरुपात मोठी रक्कम मिळाल्याचा आरोप खडसेंनी केला. त्यामुळं यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरवातही गोंधळ आणि गदारोळानं होण्याची शक्यता आहे.